तत्त्वार्थसूत्र
तत्त्वार्थसूत्र हे जैन दर्शनातील अत्यंत महत्त्वपूर्ण व सर्वमान्य ग्रंथ असून आचार्य उमास्वामी यांनी संस्कृत भाषेत सूत्रशैलीत रचले आहे. या ग्रंथात जीव, अजीव, आस्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष या सात तत्त्वांचे शास्त्रशुद्ध विवेचन केले आहे. दहा अधिकारांमध्ये विभागलेल्या या ग्रंथात पहिले चार अधिकार जीवाधिकार, पाचवा अजीवाधिकार, सहावा-सातवा आस्रवाधिकार, आठवा बंधाधिकार, नववा संवर-निर्जराधिकार आणि दहावा मोक्षाधिकार असे विषय क्रमाने मांडले आहेत. मोक्षमार्गाचे सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान व सम्यक्चारित्र या रत्नत्रयाबाबत स्पष्टीकरण करणारा हा ग्रंथ दिगंबर परंपरेत अत्यंत आदरणीय मानला जातो.
मंगलाचरण
मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृताम्।
ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये॥
अर्थ: जे मोक्षमार्गाचे नेते आहेत, कर्मांच्या पर्वतांचा नाश करणारे आहेत आणि विश्वातील सर्व तत्त्वांना जाणणारे आहेत, अशा तीर्थंकरांना मी त्यांच्या गुणांची प्राप्ती व्हावी म्हणून वंदन करतो.
मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृताम्।
ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये॥
अर्थ: जे मोक्षमार्गाचे नेते आहेत, कर्मांच्या पर्वतांचा नाश करणारे आहेत आणि विश्वातील सर्व तत्त्वांना जाणणारे आहेत, अशा तीर्थंकरांना मी त्यांच्या गुणांची प्राप्ती व्हावी म्हणून वंदन करतो.
तत्त्वार्थ सूत्रातील १० अध्याय
- अध्याय १: सम्यक दर्शन, ज्ञान आणि चरित्राचे प्रकार (मती, श्रुत, अवधी, मनःपर्याय, केवलज्ञान).
- अध्याय २: जीवाची लक्षणे, चेतना आणि ५ भाव
- अध्याय ३: अधोलोक (नरक) आणि मध्यलोक (द्वीप, समुद्र, मनुष्य व तिर्यंच लोक)
- अध्याय ४: देवलोक (स्वर्ग, ४ प्रकारचे देव)
- अध्याय ५: अजीव द्रव्य (पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल).
- अध्याय ६: आस्रव (कर्मांचे आत्म्याकडे येणे) आणि त्याचे कारण
- अध्याय ७: ५ व्रते (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह) आणि त्यांचे अतिचार
- अध्याय ८: बंध (कर्मांचे आत्म्याशी बांधले जाणे आणि कर्मांचे प्रकार)
- अध्याय ९: संवर (कर्म येणे थांबवणे) आणि निर्जरा (पूर्वीच्या कर्मांचा नाश करणे/तप)
- अध्याय १०: केवलज्ञान प्राप्ती आणि मोक्ष (अष्टकर्मांचा नाश होऊन सिद्धशिला गाठणे)