महावीर पुराण
महावीर पुराण हे दिगंबर जैन परंपरेतील एक महत्त्वपूर्ण पुराण-ग्रंथ असून त्यात चोविसाव्या तीर्थंकर भगवान महावीर स्वामींचे जन्म, पूर्वभव, दीक्षा, केवलज्ञान, देशना व निर्वाण यांचे सविस्तर वर्णन केले आहे. हे ग्रंथ सकलकीर्ति भट्टारकांनी रचले असून त्यांची विद्वत्ता व दिगंबर आगमिक परंपरेशी असलेली निष्ठा या ग्रंथातून प्रकर्षाने दिसून येते. ग्रंथाची रचना एकूण एकोणीस अधिकारांमध्ये केली असून प्रत्येक अधिकारात भगवान महावीरांच्या जीवनातील विविध घटना, त्यांचे पूर्वजन्म, राज्यवैभव, वैराग्य आणि मोक्षमार्गाचे तात्त्विक विवेचन यांचा समावेश आहे.