श्रावस्ती (उत्तर प्रदेश)
श्रावस्ती ही प्राचीन कोसल राज्याची राजधानी असून तिसरे तीर्थंकर भगवान संभवनाथ यांच्या गर्भ, जन्म, तप व केवलज्ञान या चार कल्याणकांची भूमी आहे. बाराव्या-तेराव्या शतकापर्यंत भरभराटीस असलेल्या या नगरीत सम्राट अशोक व त्यांचे नातू संप्रती यांनी अनेक मंदिरे, स्तूप व विहार उभारले होते; पुढे परकीय आक्रमणांमुळे नगरीचा ऱ्हास झाला आणि सहेट-महेट परिसरात केवळ अवशेष उरले.
आधुनिक मंदिर: इ.स. १९९५ मध्ये प्रतिष्ठापित झालेले सध्याचे मंदिर ८४ फूट उंच असून चोवीसही तीर्थंकरांच्या मूर्ती येथे विराजमान आहेत. मूळनायक भगवान संभवनाथ यांची साडेतीन फूट उंचीची श्वेतवर्णी पद्मासनस्थ मूर्ती आहे.
बौद्ध व जैन दोन्ही परंपरांत महत्त्वाचे स्थान असलेली श्रावस्ती एकेकाळी भारतातील सर्वांत मोठ्या नगरांपैकी एक होती; कालांतराने लुप्त झालेले हे नगर एकोणिसाव्या शतकात पुरातत्त्व उत्खननानंतर पुन्हा प्रकाशात आले.
संबंधित शलाका पुरुष
