तिजारा (राजस्थान)
Dharmashala
तिजारा (अलवर जिल्हा, राजस्थान, दिल्ली-अलवर महामार्गावर दिल्लीपासून सुमारे ११० किमी) हे एक प्राचीन दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे.
अतिशयाची आख्यायिका: १६ ऑगस्ट १९५६ रोजी तिजारा गावात उत्खनन सुरू असताना जमिनीतून आठवे तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू यांची पांढऱ्या संगमरवरातील १५ इंच उंचीची पद्मासनस्थ मूर्ती सापडली. मूर्तीवरील शिलालेखानुसार तिची मूळ प्रतिष्ठापना विक्रम संवत १५५४ (इ.स. १४९७) मध्ये झाली होती. पुढे इ.स. १९७२ मध्ये आचार्य निर्मलसागरजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उत्खननात चंद्रप्रभूंचीच आणखी एक ८ इंच उंचीची काळ्या पाषाणातील मूर्ती त्याच पद्मासन मुद्रेत सापडली.
