सम्यग्चारित्र

आत्मा आपल्या मूळ स्वभावात (वीतरागतेत) लीन होणे आणि सर्व शुभ-अशुभ (राग-द्वेषयुक्त) क्रियांपासून दूर राहणे हा सम्यक् चारित्राचा खरा अर्थ आहे.


सम्यक् चारित्राचे २ मुख्य स्तर
दिगंबर जैन परंपरेत चारित्राचे पालन जीवनशैलीनुसार दोन भागात विभागले गेले आहे:

अणुव्रत:  श्रावकांसाठी 

जे लोक संसारात राहतात, कुटुंब चालवतात, ते अहिंसा इत्यादी व्रतांचे पूर्णपणे पालन करू शकत नाहीत. म्हणून ते या व्रतांचे अंशतः (मर्यादित) पालन करतात:

  • अहिंसा अणुव्रत: कोणत्याही त्रस (2 ते 5 इंद्रिय असलेल्या) जीवाची जाणीवपूर्वक हिंसा न करणे.
  • सत्य अणुव्रत: मोठे असत्य किंवा ज्याने दुसऱ्याचे नुकसान होईल असे न बोलणे.
  • अस्तेय/अचौर्य  अणुव्रत: चोरी न करणे किंवा दुसऱ्याची वस्तू त्याच्या परवानगीशिवाय न घेणे.
  • ब्रह्मचर्य अणुव्रत: स्व-स्त्री/स्व-पुरुष संतोष (आपल्या जोडीदाराशीच प्रामाणिक राहणे).
  • परिग्रह परिमाण अणुव्रत: धन-संपत्ती व वस्तूंची स्वतःसाठी एक मर्यादा (मर्यादित प्रमाण) आखून ठेवणे.

महाव्रत:  मुनींसाठी
घर-दार, वस्त्र व सर्व परिग्रहांचा पूर्ण त्याग करून मोक्ष मार्गावर चालणाऱ्या दिगंबर मुनींसाठी ही ५ महाव्रते असतात:

  • अहिंसा महाव्रत: कोणत्याही सूक्ष्म किंवा स्थूल जीवाची मनाने, वचनाने किंवा कायेने हिंसा न करणे.
  • सत्य महाव्रत: सर्व प्रकारच्या असत्याचा पूर्ण त्याग.
  • अस्तेय/अचौर्य महाव्रत: दिल्याशिवाय साधी गवताची काडीही न घेणे.
  • ब्रह्मचर्य महाव्रत: मनातून, वचनातून आणि कृतीतून स्त्री-पुरुषाच्या सर्व भोगांचा पूर्ण त्याग.
  • अपरिग्रह महाव्रत: बाह्य कपड्यांपासून ते अंतरांगातील क्रोधापर्यंत सर्व १४ परिग्रहांचा पूर्ण त्याग.

आगम ग्रंथ संदर्भ

असुहादो विणिवित्ती, सुहे पवित्ती य जाण चारित्तं वदसमिदिगुत्तिरूवं, ववहारणया दु जिणभणियं ॥45॥

🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान