आ पद्मनंदी
आचार्य पद्मनंदी हे आचार्य वीरनंदी यांचे शिष्य असून साधारणपणे इ.स. अकराव्या-बाराव्या शतकात होऊन गेले. (आचार्य कुंदकुंदांचेही एक नाव 'पद्मनंदी' असल्याने आणि परंपरेत या नावाचे अनेक आचार्य असल्याने हे वेगळे आचार्य आहेत हे लक्षात ठेवावे.)
धर्मोपदेश, दान, अनित्यता, एकत्व, श्रावकाचार, ब्रह्मचर्य, निश्चयनय आणि अनेक भक्तिस्तोत्रे यांचा समावेश असलेल्या त्यांच्या प्रासादिक संस्कृत रचना 'पद्मनंदी पंचविंशतिका' म्हणून संग्रहित असून त्या गृहस्थ व साधू दोघांच्या स्वाध्यायात लोकप्रिय आहेत.
प्रमुख ग्रंथ: पद्मनंदी पंचविंशतिका (२६ प्रकरणे — उदा. धर्मोपदेशामृत, एकत्व-सप्तती, अनित्य-पंचाशत्).
रचलेले आगम ग्रंथ
पद्मनंदी पंचविन्शतिका
आचार्य पद्मनंदी विरचित हे ग्रंथ दिगंबर जैन परंपरेतील धर्म, दान, आचार, स्तोत्र व आत्मभावना यांवरील पंचविसाव्या अधिकारांचा संग्रह आहे.