पद्मनंदी पंचविन्शतिका
पद्मनंदी पंचविन्शतिका हा आचार्य पद्मनंदी यांनी रचलेला दिगंबर जैन परंपरेतील एक महत्त्वपूर्ण संग्रहग्रंथ असून यात पंचवीस अधिकारांमध्ये धर्मोपदेश, दानोपदेश, अनित्यता, एकत्व, ब्रह्मचर्य, यति-भावना, उपासक-संस्कार, तसेच ऋषभ, जिनेन्द्र, शान्तिनाथ आदी तीर्थंकरांची स्तोत्रे समाविष्ट आहेत. या ग्रंथात श्रावक आणि मुनी या उभय साधकांसाठी आचारशुद्धी, आत्मभावना व परमार्थदृष्टी यांचे विवेचन केले आहे. निश्चय पञ्चाशत्, एकत्व भावना, शरीराष्टक, स्नानाष्टक यांसारख्या अधिकारांद्वारे हा ग्रंथ मोक्षमार्गाच्या अनुभवाचे सर्वांगीण दर्शन घडवतो.