केवली परंपरा

(इ.स.पूर्व ५२७ ते ३६५)
भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर तीन अंतिम केवली झाले. त्यांनी पूर्ण केवलज्ञान प्राप्त केले होते:

केवली कालखंड (एकूण ६२ वर्षे)
भगवान महावीरांच्या मोक्षाच्या दिवसापासून पुढील ६२ वर्षांपर्यंतच्या काळाला 'अनुबद्ध केवली काल' म्हणतात. या काळात एकापाठोपाठ एक अशा तीन महान आत्म्यांनी पूर्ण 'केवलज्ञान' प्राप्त केले:

गौतम स्वामी (पहिले केवली):
  • कालखंड: वीर निर्वाण संवत १ ते १२ (इ.स.पूर्व ५२७ ते ५१५)
  • अवधी: १२ वर्षे
  • वैशिष्ट्य: भगवान महावीरांच्या निर्वाणाच्या दिवशीच यांना केवळज्ञान प्राप्त झाले
सुधर्मास्वामी (दुसरे केवली):
  • कालखंड: वीर निर्वाण संवत १२ ते २४ (इ.स.पूर्व ५१५ ते ५०३)
  • अवधी: १२ वर्षे
  • वैशिष्ट्य: गौतम स्वामींच्या मोक्षप्राप्तीच्या दिवशी यांना केवळज्ञान झाले
जंबूस्वामी (अंतिम केवली):
  • कालखंड: वीर निर्वाण संवत २४ ते ६२ (इ.स.पूर्व ५०३ ते ४६५)
  • अवधी: ३८ वर्षे
  • वैशिष्ट्य: या युगातील हे अंतिम केवली होते. यांच्या निर्वाणानंतर या भरत क्षेत्रातून केवलज्ञान मिळवण्याची परंपरा संपुष्टात आली

श्रुतकेवली कालखंड (एकूण १०० वर्षे)
जंबूस्वामींच्या मोक्षानंतर कोणालाही थेट केवलज्ञान झाले नाही, परंतु पुढील १०० वर्षे अशा आचार्यांची परंपरा होती ज्यांना संपूर्ण जैन आगमांचे (१२ अंगे आणि १४ पूर्व) परिपूर्ण मौखिक ज्ञान होते. त्यांना 'श्रुतकेवली' म्हटले जाते.दिगंबर परंपरेनुसार ५ श्रुतकेवली (वीर निर्वाण संवत ६२ ते १६२ | इ.स.पूर्व ४६५ ते ३६५):
  • विष्णुकुमार (विष्णुनंदी): १४ वर्षे (इ.स.पूर्व ४६५ ते ४५१).
  • नंदीमित्र: २२ वर्षे.
  • अपराजित: १९ वर्षे.
  • गोवर्धन स्वामी: २९ वर्षे.
  • आचार्य भद्रबाहू (अंतिम श्रुतकेवली): १४ वर्षे (अंदाजे इ.स.पूर्व ३७९ ते ३६५)

केवलींचे प्रकार: केवली परंपरा समजून घेण्यासाठी केवलींचे दोन मुख्य प्रकार समजणे आवश्यक आहे:
  • तीर्थंकर केवली: जे धर्मतीर्थाची स्थापना करतात आणि ज्यांच्या समवशरणामध्ये सर्व जीवांना उपदेश मिळतो (उदा. भगवान आदिनाथ, भगवान महावीर)
  • सामान्य केवली: जे स्वतः कठोर तप करून केवळज्ञान प्राप्त करतात आणि मोक्षाला जातात, परंतु ते तीर्थंकर नसतात (उदा. बाहुबली स्वामी).
पुढे: आचार्य भद्रबाहु – अंतिम श्रुत केवली
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान