अमितगति आचार्य

इ.स. १०वे-११वे शतक · मध्य भारत (मालवा प्रदेश)

आचार्य अमितगती हे परमार राजा मुंज व भोज यांच्या काळात माळवा प्रदेशात कार्यरत असलेले माथुर संघाचे विद्वान आचार्य होते; त्यांच्या अनेक ग्रंथांवर इ.स. ९९४ ते १०१७ दरम्यानच्या तारखा आहेत. परंपरेत याच नावाचे एक पूर्ववर्ती आचार्यही (अमितगती प्रथम) होऊन गेले; 'योगसार प्राभृत' काही विद्वानांच्या मते त्यांचे आहे.

सुभाषिते, कथा, श्रावकाचार आणि अध्यात्म अशा विविध विषयांवर त्यांनी सरस संस्कृत काव्य रचले. सामायिकाच्या वेळी आजही म्हटली जाणारी 'सत्त्वेषु मैत्रीं गुणिषु प्रमोदम्…' ही भावना त्यांच्याच 'भावना-द्वात्रिंशतिके'तील आहे.

प्रमुख ग्रंथ: योगसार प्राभृत, सुभाषितरत्नसंदोह, धर्मपरीक्षा, पंचसंग्रह, अमितगती श्रावकाचार, भावना-द्वात्रिंशतिका.

रचलेले आगम ग्रंथ

योगसार प्राभृत

आचार्य अमितगतिरचित योगसार प्राभृत हा जैन तत्त्वज्ञानातील सात तत्त्वे व मोक्षमार्ग यांचे सारगर्भ विवेचन करणारा ग्रंथ आहे.

पुढे: आचार्य नेमिचन्द्र सिद्धान्ति देव →
📝 नवीनतम प्रश्नमंजुषा: दीपावली विशेष प्रश्नमंजुषा – भगवान महावीर निर्वाणसोडवा →
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान