धर्मनाथ - केवलज्ञान कल्याणक
धर्मनाथ यांचे केवलज्ञान कल्याणक रत्नपुरी (उत्तर प्रदेश) येथे झाले. धर्मनाथ हे पंधरावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा भानु व माता सुव्रतादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे रत्नपुरी व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.