धर्मनाथ

पिता: भानुराजा · माता: सुव्रतादेवी
कुळ: इक्ष्वाकु · आयुष्य: १० लाख वर्ष
प्रकार: तीर्थंकर
धर्मनाथ हे पंधरावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा भानु व माता सुव्रतादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे रत्नपुरी व  ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.
प्रमुख विवरण व परिचय
  • माता-पिता: पिता राजा भानु आणि माता राणी सुव्रता (सुप्रभा)
  • वंश: इक्ष्वाकु वंश 
  • चिन्ह / लांछन: वज्रदंड 
  • वर्ण (रंग): सुवर्ण (सोनेरी / तप्त कांचन वर्ण)
  • केवली वृक्ष: सप्तपर्ण वृक्ष 
  • आयुष्यमान:| १० लाख वर्षे 
  • शरीरमान (उंची):४५ धनुष्य

नावामागील कथा व महत्त्व
  • गर्भकाळात मातेच्या धार्मिक वृत्तीत अभूतपूर्व वृद्धी झाली आणि राज्यात सर्वत्र धर्म आणि न्यायाचे वातावरण निर्माण झाले. सर्व प्रजा धार्मिक कार्यात तल्लिन झाली, म्हणून या बालकाचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले.
  • त्यांनी 'सुदर्शना' पालखीत बसून सहेतुक वनात १,००० साथीदारांसह दीक्षा घेतली.
  • २ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर सप्तपर्ण वृक्षाखाली केवलज्ञान प्राप्त झाले.
धर्मसंघ व शासंदेव
  • मुख्य गणधर: अरिष्टसेन (एकूण ४३ गणधर)
  • शासंदेव (यक्ष व यक्षी): किन्नर यक्ष' आणिमानसी देवी (यक्षी).
  • मुनी व साध्वी संघ: त्यांच्या धर्मसंघात सुमारे ६४,००० मुनी (साधू) आणि ६२,००० आर्यिका (साध्वी) होत्या.
चिन्ह: वज्र

पंच कल्याणक

कल्याणकस्थानतिथी
गर्भ कल्याणकरत्नपुरी (उत्तर प्रदेश)वैशाख कृष्ण सप्तमी
जन्म कल्याणकरत्नपुरी (उत्तर प्रदेश)माघ शुक्ल तृतीया
दीक्षा (तप) कल्याणकरत्नपुरी (उत्तर प्रदेश)माघ शुक्ल तृतीया
केवलज्ञान कल्याणकरत्नपुरी (उत्तर प्रदेश)पौष शुक्ल पूर्णिमा
मोक्ष कल्याणकसम्मेदशिखरज्येष्ठ शुक्ल पंचमी
निर्वाण आसन: Padmasana
चैत्य वृक्ष: सप्तपर्ण वृक्ष
गणधर संख्या: 43 · मुख्य गणधर: अरिष्टसेन
पुढे: शांतिनाथ
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान