श्री सिध्दचक्रची आरती (जय सिध्दचक्र देवा )
)
जय सिध्दचक्र देवा जय सिध्दचक्रदेवा ।
करिती तुमची निशिदिनि सुरनर सुमने मुनिसेवा || १ ||
ज्ञानवरणादिक कर्माष्ट कनेले विलयास ।
वन्दन करिती नागनरामर तुमच्या पायास ॥ २ ॥
ज्ञान नि दर्शन सुख बल तुमचे अनन्तता धरिती ।
सूक्ष्म, अगुरुलघु, अवगाहन ही अबाधता वरिती ॥ ३ ॥
उदेह आपण शुध्द चिन्मय स्वागत रतभोगी ।
तुम्हां जपती सूरि नि पाठक सदैव मुनि योगी ॥ ४ ॥
तुम्हा ब्रम्हा हरि हर सुरपति गणेश हे ध्याती ।
पदाब्ज-सेवनि भव्य श्रृंग हे गुंग सदा होती ॥ ५ ॥
संकट-हरणा अधमोध्दरणा भवसागर-रणा ।
अष्टकर्म-रिपुहरा आमुच्या जन्मजरा-मरणा ॥ ६ ॥
डाकिनी शाकिनि भूत पिशाची व्यंतर उपसर्ग ।
नाम-चिंतने क्षणांत पळती तरती जन दुर्ग ॥ ७ ॥
दीन नि दुःखी दुबळे निंर्धन जे नाना रोगी।
शुध्द सिध्दचक्राते ध्यातां होती सुखभोगी ॥ ८ ॥
वनाग्नि जल अरि पर्वत विषधर सिंह नि घोर रण ।
सिध्दचक्र हे हरिते यांचे भव करिता स्मरण ॥ ९ ॥
मदनसुंदरी करिती झाली सुसिध्दचक्राचे ।
पूजन नन्दीश्वर-पर्वामधि आठ दिनी साचे ॥ १० ॥
तिच्या पतीचा कुष्ठ नि त्याच्या मित्रांचा गेला
भवसिन्धुतुनि तरुनि तिचा पती मुक्तिसुखी झाला || ११ ||
कार्तिक फाल्गुन आषाढाच्या आठ दिनी पूजा ।
श्रीसिध्दांची करितो नर तो हरितो भववीजा ॥ १२ ॥