विमलनाथ

पिता: कृतवर्मा · माता: जयश्यामादेवी
कुळ: इक्ष्वाकु · आयुष्य: ६० लाख वर्ष
प्रकार: तीर्थंकर
विमलनाथ हे तेरावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा कृतवर्मा व माता जयश्यामादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे कांपिल्यपुरव नगरीत झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.
प्रमुख विवरण व परिचय
  • जन्मस्थान: कंपिला / कांपिल्यजी (सध्याचे फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश)
  • माता-पिता: पिता राजा कृतवर्मा आणि माता राणी जयश्यामा (श्यामा)
  • वंश: इक्ष्वाकु वंश
  • चिन्ह / लांछन: डुक्कर / रानडुक्कर (सूकर) 
  • वर्ण (रंग): सुवर्ण (सोनेरी / पिवळा)
  • केवली वृक्ष: जांभूळ वृक्ष (जंबू वृक्ष)
  • आयुष्यमान: ६० लाख वर्षे
  • शरीरमान (उंची):६० धनुष्य 
नावामागील कथा व महत्त्व
गर्भात असताना मातेच्या मनात अत्यंत निर्मळ (विमल) आणि पवित्र विचार निर्माण झाले. तसेच, त्यांच्या जन्माने राज्यातील प्रजेची मने निर्मळ झाली आणि बुद्धी तीक्ष्ण/विमल झाली, म्हणून त्यांचे नाव विमलनाथ ठेवण्यात आले.
धर्मसंघ व शासंदेव
मुख्य गणधर: मंदार (एकूण ५५ गणधर)
शासंदेव (यक्ष-यक्षी):'षण्मुख यक्ष आणि वैरोटी देवी (यक्षी).

चिन्ह: वराह (डुक्कर)

पंच कल्याणक

कल्याणकस्थानतिथी
गर्भ कल्याणककांपिल्यपुरज्येष्ठ कृष्ण दशमी
जन्म कल्याणककांपिल्यपुरमाघ शुक्ल तृतीया
दीक्षा (तप) कल्याणककांपिल्यपुरमाघ शुक्ल तृतीया
केवलज्ञान कल्याणककांपिल्यपुरमाघ शुक्ल षष्ठी
मोक्ष कल्याणकसम्मेदशिखरआषाढ कृष्ण अष्टमी
निर्वाण आसन: Padmasana
चैत्य वृक्ष: जांभूळ वृक्ष (जंबू वृक्ष)
गणधर संख्या: 55 · मुख्य गणधर: मंदार
पुढे: अनंतनाथ
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान