अनंतनाथ
अनंतनाथ हे चौदावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा सिंहसेन व माता सुयशादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे अयोध्या येथे झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.
प्रमुख विवरण व परिचय
- माता-पिता: राजा सिंहसेन पिता आणि माता राणी सुयशा (जयश्यामा)
- वंश: इक्ष्वाकु वंश
- चिन्ह / लांछनससा: सायाळ/ससा / शशक
- वर्ण: (रंग)सुवर्ण (सोनेरी / तप्त कांचन वर्ण)
- केवली वृक्ष: अशोक वृक्ष
- आयुष्यमान: ३० लाख वर्षे
- शरीरमान (उंची): ५० धनुष्य (सुमारे १५० मीटर)
- त्यांनी १,००० राजांसोबत पालखी 'सागरदत्ता' मध्ये बसून सहेतुक वनात दीक्षा घेतली.
नावामागील कथा व महत्त्व
दिगंबर परंपरेनुसार, गर्भकाळात त्यांच्या मातेने स्वप्नात एक 'अनंत' (अथांग/असीम) तेजाचे रत्न पाहिले होते. तसेच, भगवान अनंतनाथ यांच्या जन्माने विश्वात अनंत कल्याणाचा प्रभाव पसरला आणि त्यांच्या केवलज्ञानातून जगाला अनंत चतुष्टय (अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य) मिळण्याचा मार्ग दाखवला गेला; म्हणून त्यांचे नाव 'अनंतनाथ' ठेवण्यात आले.
धर्मसंघ व शासंदेव
- मुख्य गणधर: जयधात्री (किंवा जयदत्त) – एकूण ५० गणधर होते.
- शासंदेव (यक्ष व यक्षी): 'पाताल यक्ष' आणि 'अनंतमती देवी' (यक्षी).
- मुनी व साध्वी संघ: त्यांच्या धर्मसंघात सुमारे ६६,००० मुनी (साधू) आणि १,०८,००० आर्यिका (साध्वी) होत्या.
पंच कल्याणक
| कल्याणक | स्थान | तिथी |
|---|---|---|
| गर्भ कल्याणक | अयोध्या (उत्तर प्रदेश) | कार्तिक कृष्ण प्रतिपदा |
| जन्म कल्याणक | अयोध्या (उत्तर प्रदेश) | ज्येष्ठ कृष्ण द्वादशी |
| दीक्षा (तप) कल्याणक | अयोध्या (उत्तर प्रदेश) | ज्येष्ठ कृष्ण द्वादशी |
| केवलज्ञान कल्याणक | अयोध्या (उत्तर प्रदेश) | वैशाख कृष्ण एकादशी |
| मोक्ष कल्याणक | श्री सम्मेद शिखरजी (झारखंड) | चैत्र कृष्ण अष्टमी |