शांतिनाथ
भगवान शांतिनाथ हे जैन परंपरेतील अत्यंत विशेष तीर्थंकर आहेत, कारण ते एकाच जन्मात तीर्थंकर, चक्रवर्ती (१२ चक्रवर्तींपैकी ५ वे) आणि कामदेव (२४ कामदेवांपैकी १२ वे) या तिन्ही पदव्यांनी विभूषित होते.
संक्षिप्त जीवन परिचय व शारीरिक वैशिष्ट्ये
दीक्षा, केवलज्ञान व चक्रवर्ती पद
- मूळ नाव: शांतिनाथ (त्यांच्या जन्मामुळे संपूर्ण जगभरातील महामारी, दुष्काळ आणि शांतता दूर झाली, म्हणून इंद्राने त्यांचे नाव 'शांतिनाथ' ठेवले).
- माता-पिता: वडिलांचे नाव राजा विश्वसेन आणि आईचे नाव राणी अचिरा देवी
- जन्म स्थान: हस्तिनापूर नगरी.
- जन्म तिथी: जेष्ठ कृष्ण चतुर्दशी.
- चिन्ह (लांच्छन): मृग (हरिण).
- शरीराचा रंग (वर्ण): तप्त कांचन वर्ण (तपकिरी-सुवर्ण)
- उंची: ४० हात (अंदाजे ६० फूट)
- आयुष्य: १ लाख वर्षे.
दीक्षा, केवलज्ञान व चक्रवर्ती पद
- त्यांनी २५,००० वर्षे राज्य केले आणि ६ खंडांवर विजय मिळवून चक्रवर्ती पद भूषवले.
- दीक्षा: वयाच्या ७५,००० व्या वर्षी, एका दर्पण (आरशात) स्वतःच्या शरिरात पांढरा केस पाहून संसाराच्या नश्वरतेची जाणीव झाली आणि त्यांनी जेष्ठ कृष्ण चतुर्दशीला हस्तिनापुरात दिगंबर मुनी दीक्षा घेतली.
- तपश्चर्या व केवलज्ञान: १६ वर्षे कठोर मौन व तपश्चर्या केल्यानंतर हस्तिनापुरातील नंदी वृक्षाखाली पौष शुक्ल दशमीला त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले.
- समवशरणात त्यांच्या दिव्यध्वनीद्वारे जगाला शांती, अहिंसा आणि क्षमेचा संदेश मिळाला. त्यांचे ३५ गणधर होते (प्रमुख गणधर: चक्रायुध - त्यांचाच पूर्वपुत्र).
- सर्व तीर्थंकरांप्रमाणे त्यांच्या ठिकाणीही ४६ गुण (३४ अतिशय, ८ प्रातिहार्य, ४ अनंत चतुष्टय) प्रकट झाले.
- मोक्ष (निर्वाण): जेष्ठ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी सम्मेद शिखरजी येथील 'शांति कुट' वरून त्यांना मोक्ष प्राप्त झाला. शांतिनाथांची पूजा केल्याने रोग, भय आणि उपद्रव शांत होतात अशी जैन धर्मात मान्यता आहे.
पंच कल्याणक
| कल्याणक | स्थान | तिथी |
|---|---|---|
| गर्भ कल्याणक | हस्तिनापूर (उत्तर प्रदेश) | भाद्रपद कृष्ण सप्तमी |
| जन्म कल्याणक | हस्तिनापूर (उत्तर प्रदेश) | ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी |
| दीक्षा (तप) कल्याणक | हस्तिनापूर (उत्तर प्रदेश) | ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी |
| केवलज्ञान कल्याणक | हस्तिनापूर (उत्तर प्रदेश) | पौष शुक्ल दशमी |
| मोक्ष कल्याणक | श्री सम्मेद शिखरजी (झारखंड) | ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी |