जीव
६ द्रव्यांतील (षट्द्रव्यातील)'जीव द्रव्य' हे सर्वात महत्त्वाचे आणि एकमेव चेतन (जीव) द्रव्य आहे. उरलेली ५ द्रव्ये (पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल) ही 'अजीव' म्हणजेच जड/निर्जीव आहेत.
ज्याच्यामध्ये चेतना (जाणण्याची आणि अनुभवण्याची शक्ती) असते, त्याला जीव किंवा आत्मा म्हणतात.
- अनादी आणि अनंत: जीव द्रव्याची निर्मिती कोणीही केलेली नाही (ईश्वराने बनवलेला नाही). तो अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत राहील.
- अमूर्त: आत्म्याला स्वतःचा असा कोणताही स्पर्श, रस, गंध किंवा रंग नसतो.
- संख्या: जगात जिवांची संख्या अनंत आहे.
निश्यय नय व व्यवहार नय प्रमाणे जीवाची व्याख्या
- निश्यय नय : ज्याला चेतना (ज्ञान व दर्शन) आहे.
- व्यवहार नय : ज्याला इंद्रिय, बल, आयु, शासोच्छ्वास हे प्राण असतात
जैन ग्रंथांमध्ये जीवाचे मूलभूत् आणि स्वाभाविक गुण सविस्तर वर्णिलेले आहेत. हे गुण दोन प्रकारात विभागले जातात:
अ. विशेष गुण (जे फक्त जीवात असतात) आणि सामान्य गुण (जे इतर द्रव्यांतही असतात).
मुख्य विशेष गुण- उपयोग/ चेतना:
ज्ञानोपयोग: वस्तूचे विशेष आणि सूक्ष्म भान होणे.
दर्शनोपयोग: वस्तूचे सामान्य/प्राथमिक भान होणे.
- अमूर्तिकत्व: जीव डोळ्यांनी दिसत नाही किंवा पाचही इंद्रियांनी त्याचा अनुभव घेता येत नाही, कारण तो रूप, रस, गंध आणि स्पर्शापासून मुक्त आहे.
- कर्तृत्व: संसारी जीव हा स्वतःच्या शुभ आणि अशुभ विचारांचा, भाव-कर्मांचा आणि क्रियांचा स्वतः कर्ता असतो.
- भोक्तृत्व: स्वतः केलेल्या कर्मांचे फळ (सुख किंवा दुःख) भोगणारा जीवच असतो.
- स्व-पर प्रकाशक: जसा दिवा किंवा सूर्य स्वतःलाही प्रकाशित करतो आणि परिसरातील वस्तूंनाही दाखवतो; तसा जीव आत्मज्ञानाने स्वतःला आणि संपूर्ण जगाला जाणू शकतो.
- देहप्रमाणत्व: संसारी जीव ज्या शरीरात (पर्यायात) प्रवेश करतो, त्या शरीराच्या आकाराचा बनतो (उदा. मुंगीच्या शरीरात मुंगीएवढा, हत्तीच्या शरीरात हत्तीएवढा).
जेव्हा जीव आपल्यावरील कर्माचे आवरण तपश्चर्या व ध्यानाद्वारे पूर्णपणे नष्ट करतो आणि मोक्ष मिळवतो, तेव्हा त्याचे हे ४ मूळ गुण पूर्णपणे प्रकट होतात:
- अनंत ज्ञान: संपूर्ण ब्रह्मांड आणि तिन्ही काळांतील (भूत, वर्तमान, भविष्य) सर्व गोष्टी एकाच वेळी स्पष्ट जाणण्याची शक्ती.
- अनंत दर्शन: सर्व द्रव्यांचे परिपूर्ण आणि अमर्याद भान.
- अनंत सुख: कोणत्याही बाह्य विषयावर किंवा वस्तूवर अवलंबून नसलेला, अखंड आणि शाश्वत आनंद.
- अनंत वीर्य: आत्म्याची अथांग, अक्षय आणि अनंत आत्मशक्ती.
जीव हा ज्ञानानंदस्वरूपी आहे. संसारात कर्मांमुळे त्याचा हा मूळ स्वभाव
झाकला गेला आहे. सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान आणि सम्यक् चारित्र्य या
'त्रिरत्नां'च्या मार्गाने कर्मांचा क्षय करून स्वतःचे हे सर्व गुण
पूर्णपणे प्रकट करणे हाच जीवाचा अंतिम ध्येय (मोक्ष) आहे.
- संसारी जीव: जे कर्मांच्या बंधनात अडकलेले आहेत आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यात (चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये) भटकत आहेत.
- मुक्त जीव (सिद्ध): ज्यांनी सर्व कर्मांचा क्षय करून मोक्ष (सिद्धशिला) प्राप्त केला आहे आणि जे आपल्या शुद्ध आणि शाश्वत गुणांमध्ये लीन आहेत.
आगम ग्रंथ संदर्भ
जीवो उवओगमओ अमुत्ति कत्ता सदेहपरिमाणो। भोत्ता संसारत्थो सिद्धो सो विस्ससोड्ढगई।।2।।
द्रव्यसंग्रहउपयोगो लक्षणम्
तत्त्वार्थसूत्रसंबंधित विषय
जीवाचे गुण
जैन ग्रंथांनुसार (जसे की द्रव्यसंग्रह, तत्वार्थसूत्र) जीवाच्या गुणांचे वर्गीकरण प्रामुख्याने मूलभूत (विशेष) गुण, अनंत चतुष्टय गुण (मोक्ष अवस्थेतील) आणि सामान्य गुण अशा ३ भागांत केले जाते.