शीतलनाथ
शीतलनाथ हे दहावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा दृढरथ व माता सुनंदादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे भद्रपुर (भद्दिलपुर) नगरीत झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.
कथेनुसार, भगवान शितलनाथ गर्भात असताना त्यांच्या आईच्या शरीरातील तीव्र दाह/ताप शमला होता आणि त्यांच्या स्पर्शाने सर्वांना शांतता व शितलता अनुभवता आली, म्हणून त्यांचे नाव 'शितलनाथ' ठेवण्यात आले.
पूर्वभव (मागील जन्म)
जैन ग्रंथानुसार, तीर्थंकर होण्यापूर्वी भगवान शितलनाथ यांचा जीव पूर्वपुष्करार्ध द्वीपातील 'सुसीमा' नगरीचे राजा 'पद्मगुल्म' (काही ठिकाणी पद्मोत्तर) होता. त्यांनी अत्यंत धार्मिक वृत्तीने राज्यकारभार केला आणि नंतर दीक्षा घेऊन कडक तपश्चर्या केली. या तपाच्या प्रभावाने त्यांनी 'तीर्थंकर नाम-गोत्र' कर्म अर्जित केले व स्वर्गात देव म्हणून जन्म घेतला. त्यानंतर त्यांनी भदिल्लपूरच्या राजा दृढरथांच्या घरी अवतार जन्म घेतला.
पूर्वभव (मागील जन्म)
जैन ग्रंथानुसार, तीर्थंकर होण्यापूर्वी भगवान शितलनाथ यांचा जीव पूर्वपुष्करार्ध द्वीपातील 'सुसीमा' नगरीचे राजा 'पद्मगुल्म' (काही ठिकाणी पद्मोत्तर) होता. त्यांनी अत्यंत धार्मिक वृत्तीने राज्यकारभार केला आणि नंतर दीक्षा घेऊन कडक तपश्चर्या केली. या तपाच्या प्रभावाने त्यांनी 'तीर्थंकर नाम-गोत्र' कर्म अर्जित केले व स्वर्गात देव म्हणून जन्म घेतला. त्यानंतर त्यांनी भदिल्लपूरच्या राजा दृढरथांच्या घरी अवतार जन्म घेतला.
जीवन आणि वैराग्य
- वय: त्यांचे वय १ लाख 'पूर्व' मानले जाते
- शरीराची उंची ९० धनुष्य (सुमारे २७० मीटर) होती.
- वैराग्याची घटना: राजा म्हणून ५०,००० वर्षे राज्य केल्यानंतर, त्यांनी एकदा निसर्गातील हिम/धुकं क्षणभरात नष्ट होताना पाहिले. संसाराची ही अनित्य (क्षणभंगुर) स्थिती पाहून त्यांना तीव्र वैराग्य प्राप्त झाले.
- दीक्षा: राज्यकारभार आपल्या पुत्राकडे सोपवून त्यांनी 'शुक्रप्रभा' नावाच्या पालखीत बसून जंगलाकडे प्रस्थान केले आणि माघ कृष्ण द्वादशीला १,००० साथीदारांसह दीक्षा घेतली.
- दीक्षेनंतर केवळ ३ महिन्यांच्या कठोर मौन आणि ध्यानानंतर पौष कृष्ण चतुर्दशीला 'प्रज्ञावृक्ष' (किंवा पिंपळ/बेल वृक्ष) खाली त्यांना केवलज्ञान (सर्वज्ञता) प्राप्त झाले.
- प्रथम आहार: दीक्षेनंतर त्यांचा पहिला आहार (पारणे) अरिष्टपूरच्या 'पुनर्वसु' (किंवा पद्म) राजाने दिला.
- केवलज्ञान प्राप्त झाल्यावर भगवान शितलनाथ यांनी धर्मोपदेश (देशना) दिला आणि जैन संघ स्थापन केला
- गणधर (मुख्य शिष्य): ८१ (ज्यात 'अनंत' किंवा 'अंगार' हे मुख्य गणधर होते).
- मुनी (साधू): १ लाख.
- आर्यिका (साध्वी): १ लाख ६ हजार (काही ग्रंथांत ३ लाख ८० हजार).
- यक्ष व यक्षी (शासंदेव): ब्रह्मा यक्ष आणि मानवी/अशोका देवी.
दीर्घकाळ सत्याचा आणि अहिंसेचा संदेश दिल्यानंतर, सम्मेद शिखरजी (झारखंड) या पवित्र पर्वतावर १ महिन्याचा उपवास आणि योगनिरोध करून त्यांनी वैशाख कृष्ण द्वितीया (काही परंपरेनुसार आश्विन शुक्ल अष्टमी) दिवशी मोक्ष प्राप्त केला. सम्मेद शिखरावर त्यांच्या नावाने 'शितलनाथ टोंक' (चरण पादुका) स्थापित आहे
पंच कल्याणक
| कल्याणक | स्थान | तिथी |
|---|---|---|
| गर्भ कल्याणक | भद्रपुर (भद्दिलपुर) | वैशाख शुक्ल अष्टमी |
| जन्म कल्याणक | भद्रपुर (भद्दिलपुर) | माघ कृष्ण द्वादशी |
| दीक्षा (तप) कल्याणक | भद्रपुर (भद्दिलपुर) | माघ कृष्ण द्वादशी |
| केवलज्ञान कल्याणक | भद्रपुर (भद्दिलपुर) | पौष कृष्ण चतुर्दशी |
| मोक्ष कल्याणक | श्री सम्मेद शिखरजी (झारखंड) | वैशाख कृष्ण द्वितीया |