निर्जरा
निर्जरा म्हणजे आस्त्रवाद्वारे आलेले कर्म जीवप्रदेशांमध्ये पूर्वबद्ध कर्मांशी स्कंधरूप होऊन परस्परावगाहरूपाने प्रविष्ट होतात व स्थिती पर्यंत सत्तेमध्ये राहून अंत्यस्तिथी क्षणी उदय येऊन निघून जातात.
निर्जरा म्हणजे आत्म्यावरील पूर्वी जमा झालेल्या कर्मांचे विघटन किंवा त्याग. जोपर्यंत आत्मा कर्माच्या धुळीने (जसे की आसक्ती, द्वेष आणि दुर्गुण) झाकलेला राहतो, तोपर्यंत तो संसारचक्रात अडकलेला राहतो. निर्जरा ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, ज्याद्वारे आत्मा शुद्ध होतो आणि मुक्तीच्या दिशेने प्रगती करतो.
जह कालेण तवेण य कम्माणं फलदणाण गळण जे।
तं णिज्जरइ जिणुत्ता सविवाग-अविवाग णेया ॥३४॥ — द्रव्यसंग्रह, गाथा ३४
तं णिज्जरइ जिणुत्ता सविवाग-अविवाग णेया ॥३४॥ — द्रव्यसंग्रह, गाथा ३४
अर्थ: योग्य वेळ आल्यावर किंवा तपाच्या प्रभावाने कर्मांचे फळ देऊन गळून
पडणे म्हणजे निर्जरा होय. ही निर्जरा सविपाक आणि अविपाक अशी दोन
प्रकारची असते.
आत्म्याशी पूर्वापार बांधल्या गेलेल्या कर्मांना तपाच्या आणि ध्यानाच्या अग्नीत जाळून पूर्णपणे वेगळे/नष्ट करणे म्हणजेच निर्जरा.
तपसा निर्जरा च ॥३॥ — तत्त्वार्थ सूत्र, अध्याय ९, सूत्र ३
अर्थ: तपाच्या माध्यमातून कर्मांची निर्जरा होते.
निर्जरेचे मुख्य २ प्रकार
1. सविपाक निर्जरा:
गुणस्थान आणि निर्जरेची वाढती तीव्रता
गोम्मटसार आणि तत्त्वार्थ सूत्र (अध्याय ९, सूत्र ४५) नुसार, जसा जसा जीव अध्यात्मिक गुणस्थानांमध्ये (प्रगतीच्या पायऱ्यांवर) पुढे जातो, तशी तशी कर्मांच्या निर्जरेची तीव्रता असंख्य पटीने वाढते:
तपसा निर्जरा च ॥३॥ — तत्त्वार्थ सूत्र, अध्याय ९, सूत्र ३
अर्थ: तपाच्या माध्यमातून कर्मांची निर्जरा होते.
निर्जरेचे मुख्य २ प्रकार
1. सविपाक निर्जरा:
- कर्माची स्थिती (मुदत) पूर्ण झाल्यावर ते फळ देते आणि आपोआप नष्ट होते.
- ही निर्जरा संसारातील सर्व जीवांना (अज्ञानी/मिथ्यादृष्टी जीवांनासुद्धा) निरंतर होत असते. याने मोक्ष मिळत नाही, कारण कर्म गळताना जीव नवीन कर्मे बांधत राहतो.
- कर्माचा काळ (उदय) येण्यापूर्वीच आत्मज्ञानाने आणि तपाच्या अग्नीने कर्मांना बळजबरीने खेचून आणून (उदीरणा करून) नष्ट करणे.
- ही निर्जरा केवळ सम्यग्दृष्टी आणि आत्मध्यानात लीन असलेल्या साधकांनाच होते. हीच खरी मोक्षाचे कारण असणारी निर्जरा आहे.
गुणस्थान आणि निर्जरेची वाढती तीव्रता
गोम्मटसार आणि तत्त्वार्थ सूत्र (अध्याय ९, सूत्र ४५) नुसार, जसा जसा जीव अध्यात्मिक गुणस्थानांमध्ये (प्रगतीच्या पायऱ्यांवर) पुढे जातो, तशी तशी कर्मांच्या निर्जरेची तीव्रता असंख्य पटीने वाढते:
आगम ग्रंथ संदर्भ
तपस: निर्जराच ।
तत्त्वार्थसूत्रजह कालेण तवेण य कम्माणं फलदणाण गळण जे। तं णिज्जरइ जिणुत्ता सविवाग-अविवाग णेया ॥३४॥
द्रव्यसंग्रहसंबंधित विषय
अविपाक निर्जरा
कर्माचा काळ (उदय) येण्यापूर्वीच आत्मज्ञानाने आणि तपाच्या अग्नीने कर्मांना नष्ट करण्याच्या प्रक्रियेला अविपाक निर्जरा म्हणतात.
सविपाक निर्जरा
कर्माची स्थिती (मुदत) पूर्ण झाल्यावर ते फळ देते आणि आपोआप नष्ट होण्याच्या प्रक्रियेला सविपाक निर्जरा म्हणतात. ही निर्जरा संसारातील सर्व जीवांना (अज्ञानी/मिथ्यादृष्टी जीवांनासुद्धा) निरंतर होत असते. याने मोक्ष मिळत नाही, कारण कर्म गळताना जीव नवीन कर्मे बांधत राहतो.