परोक्ष ज्ञान
इंद्रिय व मनाद्वारे होणारे ज्ञान.
जे ज्ञान पदार्थाच्या अंतरंग धर्मात प्रवेश करू शकत नाही, दुसऱ्या माध्यमातून इंद्रियांच्या सहाय्याने पदार्थाच्या केवळ बाह्यरूपाला जाणते.
दोन प्रकारे विभागणी:
१) ज्ञानाच्या प्रकारानुसार: मतिज्ञान आणि श्रुतज्ञान.
मति ज्ञान
तदिन्द्रियानिन्द्रियनिमित्तम्॥१.१४॥ तत्त्वार्थसूत्र
- मतिज्ञान इंद्रिय आणि मनाच्या निमित्ताने होते
- मति, स्मृति, संज्ञा, चिंता आणि अभिनिबोध हे मतिज्ञानाचे समानार्थी शब्द आहेत.
श्रुत ज्ञान
श्रुतं मतिपूर्वं द्व्यनेकद्वादशभेदम्॥१.२०॥
श्रुतमनिन्द्रियस्य॥२.२१॥ तत्त्वार्थसूत्र
- एका अर्थावरून दुसऱ्या अर्थाचे ज्ञान होणे हे श्रुतज्ञान
- श्रुतज्ञान मतिज्ञानपूर्वक असते आणि त्याचे दोन, अनेक व बारा भेद आहेत.
- श्रुतज्ञानाचा विषय अनिंद्रिय (मन) चा आहे.
२) न्यायशास्त्राच्या पद्धतीने:
स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान आणि आगम.
| पाच भेद (पारंपरिक) | अर्थ |
|---|---|
| स्मृती | पूर्वी अनुभवलेल्या वस्तूचे स्मरण |
| प्रत्यभिज्ञान | पूर्वी जाणलेले आणि आता दिसणारे यांना जोडणारे ज्ञान ("हेच ते") |
| तर्क | साधन-साध्य यांच्या अविनाभावी संबंधाचे (व्याप्तीचे) ज्ञान |
| अनुमान | साधनावरून साध्याचे ज्ञान |
| आगम | आप्तवचनावरून होणारे पदार्थज्ञान |
व्याख्या: ज्ञान तिन्ही काळांतील द्रव्य, गुण आणि पर्याय प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने जाणते (जीवकांड २९९). श्रुतज्ञान एका अर्थावरून दुसऱ्या अर्थाचे ज्ञान होणे असे आहे आणि ते नियमाने मतिपूर्वक असते (जीवकांड ३१५).
आगम ग्रंथ संदर्भ
आद्ये परोक्षम्॥१.११॥
तत्त्वार्थसूत्रमतिः स्मृतिः संज्ञा चिन्ताऽभिनिबोध इत्यनर्थान्तरम्॥१.१३॥
तत्त्वार्थसूत्रतदिन्द्रियानिन्द्रियनिमित्तम्॥१.१४॥
तत्त्वार्थसूत्रश्रुतमनिन्द्रियस्य॥२.२१॥
तत्त्वार्थसूत्रश्रुतं मतिपूर्वं द्व्यनेकद्वादशभेदम्॥१.२०॥
तत्त्वार्थसूत्रजाणई तिकालविसए, दव्वगुणे पज्जए य बहुभेदे। पच्चक्खं च परोक्खं, अणेण णाणं ति णं बेंति॥२९९॥
गोम्मटसार जीवकांडअत्थादो अत्थंतरमुवलंभंतं भणंति सुदणाणं। आभिणिबोहियपुव्वं, णियमेणिह सद्दजं पमुहं॥३१५॥
गोम्मटसार जीवकांडसंबंधित विषय
मतिज्ञान
पांच इंन्द्रिये व मनाच्या साहाय्याने जे होते त्याला मतिज्ञान म्हणतात. मतिज्ञान होण्याचे 4 टप्पे: अवग्रह, ईहा, अवाय आणि धारणा.
श्रुतज्ञान
श्रुतज्ञान मतिज्ञानपूर्वक होते आणि एका अर्थावरून दुसऱ्या अर्थाचे ज्ञान देते. त्याचे वीस भेद, अंगप्रविष्ट (बारा अंग) आणि अंगबाह्य (चौदा प्रकीर्णक) असे विस्तृत प्रकार आहेत.